Homeताज्या बातम्यानगरपालिकेच्या घंटागाड्यांतून थेट भंगार विक्री? बारामती कसबा श्रीराम नगरमध्ये गंभीर प्रकार उघड.

नगरपालिकेच्या घंटागाड्यांतून थेट भंगार विक्री? बारामती कसबा श्रीराम नगरमध्ये गंभीर प्रकार उघड.

बारामती | संपादक (शशिकांत खरात)
बारामती कसबा येथील श्रीराम नगर परिसरात नगरपालिकेच्या घंटागाड्यांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शहरातील घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या नगरपालिकेच्या घंटागाड्या, कचरा वेगळा करून त्यातून भंगार साहित्य वेचत असल्याचे आणि ते थेट खाजगी भंगार व्यावसायिकांना विकले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या घंटागाड्या या केवळ कचरा संकलनासाठी असताना, त्यातून प्लास्टिक, लोखंड, टिन, बाटल्या आदी भंगार वेचून विक्री केल्यास हा थेट शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि आर्थिक भ्रष्टाचाराचा प्रकार ठरतो.
नियम धाब्यावर?
नगरपालिका कचरा व्यवस्थापन नियमांनुसार, गोळा होणारा संपूर्ण कचरा प्रक्रिया केंद्रात पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात काही कर्मचारी व चालक संगनमताने कचऱ्यातील मौल्यवान भंगार वेगळे करून खाजगी भंगार दुकानदारांना विकत असल्याचा आरोप आहे.
नगरपालिका डोळेझाक करतेय का?
हा प्रकार एक-दोन दिवसांचा नसून दीर्घकाळ सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नाही, की माहिती असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दररोज शहरातून मोठ्या प्रमाणात भंगार निघत असताना, त्याचा अधिकृत लिलाव किंवा महसूल नगरपालिकेला न मिळता खाजगी खिशात जात असल्यास नगरपालिकेचे आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांची मागणी आहे
घंटागाड्यांची तात्काळ चौकशी, संबंधित कर्मचारी, चालक व भंगार व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावेत.
CCTV, GPS व अचानक तपासणी सुरू करावी
दोषींवर निलंबन व कडक कारवाई करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!