Homeताज्या बातम्याकासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण आणावे, या विविध मागण्यांसाठी कासम चाचा कुरेशी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी बारामती आरटीओ कार्यालयात आरटीओ अधिकारी श्री. एस. पी. निकम, श्री. गावडे यांच्या उपस्थितीत कासम चाचा कुरेशी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरटीओचा वैध परवाना असलेल्या वाहनांना जनावरांच्या बाजारात नियमितपणे वाहतूक करता यावी, तसेच विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय, काही ठिकाणी बोगस गोरक्षक किंवा कोणताही अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वाहनांना अडवून विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा प्रकारच्या मनमानीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच सामाजिक व जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधितांवर कायद्यानुसार नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली.डंपर व ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मागणी बारामती शहर व तालुक्यात भरधाव वेगाने तसेच क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या डंपर, डंपिंग ट्रक व इतर अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. या वाहनांमुळे यापूर्वी अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे तपासणी व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. *विशेषतः परमिटची मुदत संपलेल्या वाहनांवर कारवाई करून अशी वाहने ताब्यात घेण्यात यावीत, अशी मागणी कासम चाचा कुरेशी यांनी केली.* आरटीओकडून सकारात्मक प्रतिसाद या मागण्यांवर आरटीओ प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. स्टाफची संख्या कमी असल्याने सध्या कामाचा ताण वाढत असला, तरी प्राप्त सूचनांनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.विशेष म्हणजे, बैठकीनंतरही काही वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर प्रशासनाची नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बाजार समिती व वाहनमालक संघटनेसोबत बैठक होणार जनावरांच्या वाहतुकीशी संबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वाहन चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन पुढील कार्यवाहीची रूपरेषा निश्चित करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने सांगितले.
या बैठकीमुळे वैध परवाना असलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, विनापरवाना व नियमबाह्य वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.यावेळी आरटीओ अधिकारी, कासम चाचा कुरेशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. गावडे यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.कासम चाचा कुरेशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जनावरांच्या वाहतुकीपासून ते अवजड वाहनांच्या बेकायदा व धोकादायक वाहतुकीपर्यंत विविध प्रश्न आरटीओ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, त्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याने या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे मानले जात आहे. यानंतर पोलीस प्रशासन,आरटीओ प्रशासन,चालक मालक संघटना,व कासम चाचा कुरेशी यांच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवण्याचे ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

माहिती अधिकाराची ताकद दाखवून दिली; अब्राहाम आढाव यांनी मिळवली मुख्यमंत्र्यांच्या वेतनाची माहिती..!

0
संपादक / शशिकांत खरातमाहिती अधिकार कार्यकर्ते तथा प्रशिक्षक अब्राहाम आढाव (रा. वडगावशेरी, पुणे) यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ऑनलाईन RTI प्रणालीद्वारे २३ जुलै...

error: Content is protected !!