Homeताज्या बातम्यामाहिती अधिकाराची ताकद दाखवून दिली; अब्राहाम आढाव यांनी मिळवली मुख्यमंत्र्यांच्या वेतनाची माहिती..!

माहिती अधिकाराची ताकद दाखवून दिली; अब्राहाम आढाव यांनी मिळवली मुख्यमंत्र्यांच्या वेतनाची माहिती..!

संपादक / शशिकांत खरात
माहिती अधिकार कार्यकर्ते तथा प्रशिक्षक अब्राहाम आढाव (रा. वडगावशेरी, पुणे) यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ऑनलाईन RTI प्रणालीद्वारे २३ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे अर्ज दाखल करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मे २०२६ आणि जून २०२६ या कालावधीत मिळालेल्या मासिक वेतन व भत्त्यांची माहिती मागितली होती. या अर्जावर सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथील जनमाहिती अधिकारी रोहिणी सकपाळ यांनी २८ जुलै २०२६ रोजी माहिती उपलब्ध करून दिली.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्राचे मंत्री वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना:
मे २०२६ मध्ये ₹३,९७,७५०/-
जून २०२६ मध्ये ₹३,७७,५००/-
इतके मासिक वेतन व भत्ते अदा करण्यात आले.अब्राहाम आढाव यांनी सांगितले की, शासकीय कारभारातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे हे उत्तम उदाहरण आहे. जनतेच्या करातून लोकप्रतिनिधी आणि शासकीय सेवकांना वेतन व भत्ते दिले जातात. त्यामुळे नागरिकांना ही माहिती मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या वेतनाची माहिती मागितल्यास विविध कारणे देऊन ती नाकारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच्या वेतनाची माहिती माहिती अधिकारातून उपलब्ध करून देत असतील, तर इतर सर्व शासकीय विभागांनीही माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ४ अन्वये वेतन, भत्ते व इतर आवश्यक माहिती आपल्या संकेतस्थळावर स्वयंस्फूर्तीने प्रकाशित करणे बंधनकारक आहे.अब्राहाम आढाव यांनी सर्व शासकीय विभागांना पारदर्शक प्रशासनासाठी माहितीचे सक्रीय प्रकटीकरण (Proactive Disclosure) प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!