

संपादक /शशिकांत खरात
बारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांना कुकर, जर्किन आदी भेटवस्तू देण्यात आल्या. मुथा सरांच्या कुटुंबीयांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होत माणुसकी जपणाऱ्या विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे बारामतीत कौतुक होत आहे.
कार्यक्रमास ॲड.सुधीरजी पाटसकर, सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे, पत्रकार तैनुरभाई शेख, चिऊशेठ जंजिरे, अमित भैय्या बगाडे, प्रशांत मामा कुचेकर, पवनराजे बनसोडे, नेताजी बुरुंगले, नरेंद्र भाऊ मिसाळ, विठ्ठल शेठ आगवणे, ओंकार शेठ राऊत, चेतन शेठ वाडेकर, विनोद भैय्या हिंगमिरे यांच्यासह विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात









