Homeताज्या बातम्याऐकू येत नसतानाही जिद्दीची कमाल; नियुक्ती खरातची दहावीत ८९.२० टक्क्यांची सुवर्णभरारी..!

ऐकू येत नसतानाही जिद्दीची कमाल; नियुक्ती खरातची दहावीत ८९.२० टक्क्यांची सुवर्णभरारी..!

डीजेच्या कर्कश आवाजामुळे गमावली श्रवणशक्ती, पण आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले घवघवीत यश
माळेगाव प्रतिनिधी —
प्रतिकूल परिस्थिती आणि कर्णबधिरतेवर मात करत बारामती येथील नियुक्ती अमोल खरात हिने दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. तिच्या या संघर्षमय यशाची सर्वत्र चर्चा होत असून विविध स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.लहानपणी एका लग्न समारंभात डीजेच्या कर्कश आवाजामुळे नियुक्तीला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिच्या कुटुंबियांनी अनेक मोठ्या रुग्णालयांत उपचार केले. कानाची मशीन लावूनही अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र या संकटासमोर न झुकता नियुक्तीने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली.
तिने विद्या प्रतिष्ठानच्या विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. शिक्षकांच्या ओठांच्या हालचाली समजून घेत अभ्यास करणारी नियुक्ती कोणतीही खाजगी शिकवणी न लावता स्वअध्ययनाच्या जोरावर यशस्वी ठरली. तिच्या अभ्यासात आई स्वाती, वडील अमोल खरात आणि मोठी बहीण श्रृती यांनी मोलाची साथ दिली.या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य आशिष घोष व वर्गशिक्षिका खोडवे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
“माझे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे,” अशी भावना नियुक्ती खरात हिने व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!