Homeताज्या बातम्याऐकू येत नसतानाही जिद्दीची कमाल; नियुक्ती खरातची दहावीत ८९.२० टक्क्यांची सुवर्णभरारी..!

ऐकू येत नसतानाही जिद्दीची कमाल; नियुक्ती खरातची दहावीत ८९.२० टक्क्यांची सुवर्णभरारी..!

डीजेच्या कर्कश आवाजामुळे गमावली श्रवणशक्ती, पण आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले घवघवीत यश
माळेगाव प्रतिनिधी —
प्रतिकूल परिस्थिती आणि कर्णबधिरतेवर मात करत बारामती येथील नियुक्ती अमोल खरात हिने दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवत प्रेरणादायी यश संपादन केले आहे. तिच्या या संघर्षमय यशाची सर्वत्र चर्चा होत असून विविध स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.लहानपणी एका लग्न समारंभात डीजेच्या कर्कश आवाजामुळे नियुक्तीला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिच्या कुटुंबियांनी अनेक मोठ्या रुग्णालयांत उपचार केले. कानाची मशीन लावूनही अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र या संकटासमोर न झुकता नियुक्तीने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली.
तिने विद्या प्रतिष्ठानच्या विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. शिक्षकांच्या ओठांच्या हालचाली समजून घेत अभ्यास करणारी नियुक्ती कोणतीही खाजगी शिकवणी न लावता स्वअध्ययनाच्या जोरावर यशस्वी ठरली. तिच्या अभ्यासात आई स्वाती, वडील अमोल खरात आणि मोठी बहीण श्रृती यांनी मोलाची साथ दिली.या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य आशिष घोष व वर्गशिक्षिका खोडवे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
“माझे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे,” अशी भावना नियुक्ती खरात हिने व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!