
बारामती / संपादक (शशिकांत खरात)
बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशनच्या सतर्क आणि धडाकेबाज कारवाईत NDPS कायद्याअंतर्गत मोठा अंमली पदार्थ विरोधी गुन्हा उघडकीस आला आहे.
दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:05 वाजता, बारामती शहर हद्दीतील बोके हॉस्पिटलजवळील रिंग रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एका तरुणाला गांजासह ताब्यात घेतले.
या कारवाईत
1 किलो 989 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹39,780)
हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (अंदाजे किंमत ₹50,000)
ऐक पांढरी पिशवी
असा एकूण ₹89,780 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव: फरहान युसुफ शेख (वय 23), रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.
या प्रकरणी NDPS ACT कलम 20 (ब)(II)(ब) व 8 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कैलास सिताप यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून
दाखल अंमलदार: पो. हवा. शेख (ब.नं. 2121)
तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक भंडारे
हे तपास करत आहेत.
अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्यात बारामती पोलिसांचा ठोस संदेश – गुन्हेगारांना कोणतीही माफी नाही!
सुचना :- नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बारामती शहर पोलिसांचे सर्व बारामतीकरां कडुन कौतुक होताना दिसत आहे .

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








