
संपादक / शशिकांत खरात
प्रशासनात अनेक अधिकारी येतात आणि जातात; पण काही जण आपल्या कामामुळे जनतेच्या मनावर कायमचा ठसा उमटवतात. तुकाराम मुंढे हे असेच एक नाव आहे. नियम पायदळी तुडवणाऱ्यांना, सरकारी यंत्रणेला स्वतःची जहागीर समजणाऱ्यांना आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या व्यवस्थेला त्यांनी थेट आव्हान दिले.त्यांच्या कार्यपद्धतीत दिखाऊपणा नाही, तर कृती आहे. त्यामुळेच प्रामाणिक नागरिकांना ते आवडतात, तर भ्रष्टाचारावर पोसलेल्या मंडळींना ते खुपतात. अनेक बदल्या झाल्या, विरोध झाला, राजकीय दबाव आले; पण मुंढे यांनी नियमांशी तडजोड केली नाही.
आज जेव्हा प्रशासनात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तेव्हा तुकाराम मुंढे हे नाव आशेचा किरण वाटते. भ्रष्टाचार्यांसाठी धाक आणि सामान्य जनतेसाठी विश्वासाचे प्रतीक म्हणजे तुकाराम मुंढे आहे.मग या व्यवस्थेत इतरांना तुकाराम मुंडे व्हाव वाटत नाही का ? की केवळ गिळायला येतात की व्यवस्थेला घाबरतात? मग तुकाराम का घाबरत नाही. का इतरांची इच्छा नाही. केवळ पाच घंट्याची आपली नौकरी सांभाळून मड्यावर नेन्यासाठी पैसा कमवायचा आणि आपली पिलावळांना बार मधली उष्टी हाड चघळायला लावायची.माझ्या नजरेत बसेल असा एकही तुकाराम मला आजपर्यंत तरी दिसला नाही.
तुमच्या दृष्टीस पडला का ?

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








