
आरटीआय कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते अब्राहम आढाव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
बारामती : माहिती अधिकार नियम, २०२६ स्थगित करण्यात आल्याचा शासनाचा निर्णय असूनही महाराष्ट्राच्या ऑनलाईन RTI पोर्टलवर अद्याप वाढीव शुल्क आकारले जात असल्याचा मुद्दा आरटीआय कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते अब्राहम आढाव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे उपस्थित केला आहे.पत्रात नमूद करण्यात आले आहे की, दि. २ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकार नियम, २०२६ स्थगित करण्यात आले असतानाही ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती अधिकार अर्जासाठी अजूनही ₹३० शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि ऑनलाईन RTI प्रणालीमध्ये पूर्वीचे शुल्क तात्काळ लागू करावे, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








