
बारामती / संपादक शशिकांत खरात
आरोपी जहीर सिराज शेख वय 47 वर्ष पद वनपाल (वर्ग 3) करंजे राऊंड ऑफिसर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना आज दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी दिनांक 14 /10 /2026 रोजी तक्रार दिली की तक्रारदार यांची कोऱ्हाळे खुर्द येथे 4 हेक्टर शेत जमीन असून सदर शेतातील माती पावसामुळे निरा नदीत वाहून गेली होती म्हणून ते नदीपात्रातील माती शेतात टाकत असताना लोकसेवक जहीर शेख यांनी दिनांक 26/09/2026 रोजी तक्रारदारांचे काम बंद करून सदरची जागा फॉरेस्टच्या मालकीची असल्याचे सांगितले व तक्रारदार यांचे वर कारवाई करण्याची भीती घालून माती भराव करण्यास मज्जाव केला होता. सदर वेळी तक्रारदार यांनी लोकसेवकांना कारवाई न करता काम बंद न पाडण्यासाठी विनंती केली असता लोकसेवक जाहीर शेख यांनी कारवाई न करता काम सुरू ठेवण्याकरिता त्यांच्या सहकारी भुमरे मॅडम व स्वतःसाठी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून 4000/- हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारले होते व उर्वरित 6000/- रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नका असे बोलून उर्वरित 6000/- रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तक्रारदारांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 25/10/2026 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान आरोपी जहीर शेख वनपाल यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 10,000/- रुपये लाचे बाबत बोलणी करून यापूर्वी 4000/- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 6000/- रुपये पंचा समक्ष स्वीकारली असता 14.17 वाजता रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 प्रमाणे माळेगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. सापळा अधिकारी :- श्री संतोष पाटील पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे , पर्यवेक्षण अधिकारी :- श्री सतीश वाळके पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सापळा पथक 1) पोलीस कॉन्स्टेबल /1966 प्रवीण तावरे, 2) मपोशि / 7934 वैशाली माकर, 3) श्रेणी पो उपनिरीक्षक श्री अविनाश चव्हाण. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, मार्गदर्शक :- 1) श्री. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, 2) श्री. अजित पाटील अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ,

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




