
बारामती / संपादक शशिकांत खरात
बारामती तालुक्यातील गाडीखेल ग्रामपंचायत सध्या “कार्यालय” कमी आणि “बंद दरवाजा” जास्त म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कारण इथे ग्रामसेवकांना ऑफिसपेक्षा स्वतःचे घरच जास्त सोयीस्कर वाटत असल्याचे चित्र आहे.
गावकरी रोज ग्रामपंचायतीत येतात…
दरवाजा बंद पाहतात…
आणि शेवटी एकमेकांना विचारतात
“आज ग्रामपंचायत उघडेल की थेट घरी जावं लागेल? लोकांच्या कामासाठी असलेले सरकारी कार्यालय बंद ठेवून, “घरातून सेवा” देण्याचा नवीन प्रयोग गाडीखेलमध्ये सुरू आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. नागरिकांची उपरोधिक प्रतिक्रिया:
“सरकारने आता ग्रामपंचायतीऐवजी ‘ग्रामसेवकांचे घर’ अधिकृत कार्यालय घोषित करावं! कामासाठी फिरा, विनंती करा, घरी जा… तरीही सेवा वेळेवर नाही; पण पगार मात्र वेळेवर खात्यात जमा होतो यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




