
संपादक / शशिकांत खरात
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे आज शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंच व संविधान समता दिंडी महाराष्ट्र यांच्या वतीने देशाचे माजी कृषिमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन संविधान दिंडीची विठ्ठल रुपी प्रतिमा भेट दिली. संविधान दिंडीच्या निम्मित झालेल्या संविधान कीर्तनाच्या कार्यक्रमाची माहिती शरद पवार यांना दिली.हिंदू मुस्लिम एकता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी समाजात असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत पवार साहेबांनी व्यक्त केले व शाबासकीची थाप पाठीवर देऊन पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त संविधान कीर्तनाचे आयोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कासम चाचा कुरेशी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते अल्ताफ भाई बागवान हे उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात








