Homeताज्या बातम्याशेतकरी कल्याणाच्यादृष्टीने सामूहिक काम करुया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

शेतकरी कल्याणाच्यादृष्टीने सामूहिक काम करुया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रयत भवन शेतकरी मॉलच्या इमारतीचा पायाभरणी बारामती दि.१३: बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी हित व कल्याणाचा विचार करुन काम करीत आलेली आहे; आगामी काळातही देशातील सर्वोत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती बनविण्यासोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक जबाबदारीने काम करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तसेच नुतून रयत भवन शेतकरी मॉलमुळे बारामतीच्या विकासात नवे परिणाम, शेतकऱ्यांना विविध संधी मिळण्यास मदत होईल,अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन शेतकरी मॉलच्या पायाभरणी समारंभप्रसंगी त्या बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट, संचालक मंडळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला सुमारे ९० वर्षाची परंपरा आहे. शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून पारदर्शक व्यवहार, शेतमालाचे अचूक वजन, त्वरित पट्टी देण्याची व्यवस्था, ई-नाम द्वारे ऑनलाईन लिलाव आणि संगणकीकृत व्यवहार अशापद्धतीने अतिशय उत्तम काम करीत आहे. राज्यातील ३०० हुन अधिक बाजार समित्यांमध्ये बारामती बाजार समितीने प्रथम मिळवून आदर्श बाजार समिती म्हणून ओळखली निर्माण केली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
बारामती परिसरातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नाविन्यपूर्ण प्रयोग शेतीमध्ये राबवितात.त्यामुळे या परिसराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळोची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शीतगृह, ग्रेडिंग, पॅकींग, निर्यात सुविधा केंद्र,रेशीम कोशाचे ई-नामद्वारे लिलाव सुविधामुळे शेतमालाला अधिकचा भाव मिळण्यास मदत होणार आहे.
रेशीम कोशासाठी ई-नामद्वारे लिलाव सुरु करुन देशापुढे आदर्श निर्माण केला आहे.
नवीन रयत भवन शेतकरी मॉलमुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी आधुनिक पद्धतीने सेवा मिळणार आहे. भाडे उत्पन्नापोटी मिळणाऱ्या दोन कोटी रुपयामुळे समितीची आर्थिक क्षमता बळकट होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात या निधीचा उपयोग शेतकरी व बाजार घटकासाठी अधिक सुविधा निर्माण करण्यात येईल, संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनांवर सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल,  असेही श्रीमती पवार म्हणाल्या श्री. तावरे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आग्रही होते. त्यांच्या स्वप्नातील बारामती घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही श्री. तावरे म्हणाले.श्री. गावडे यांनी प्रास्तविकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेतकरी मॉलमध्ये करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. या शेतकरी मॉलला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत संचालक मंडळाच्यावतीने सूचना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महामध्ये 123 महाविद्यालये अनिवार्य नियमांशिवाय कार्यरत आहेत

0
विभागाच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81 महाविद्यालये आहेत, त्यानंतर अमरावती विभागात 20, नागपूरमध्ये 12, नाशिकमध्ये पाच, पुण्यात तीन आणि कोकण विभागातील दोन...

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

0
केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

30 जून रोजी चालवण्यास प्लांटची संमती संपली, MPCB सह नूतनीकरण प्रशासकीय विलंबामुळे अडकले

0
पुणे : पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा आणि वायु (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायद्यांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मोशीच्या...

error: Content is protected !!