Homeआरोग्यफिटनेसच्या नावाखाली तरुणांचे आरोग्य धोक्यात? बारामतीत प्रोटीन व वजनवाढीच्या पावडरचा बिनधास्त वापर...

फिटनेसच्या नावाखाली तरुणांचे आरोग्य धोक्यात? बारामतीत प्रोटीन व वजनवाढीच्या पावडरचा बिनधास्त वापर चिंताजनक

संपादक / शशिकांत खरात
बारामती | प्रतिनिधी :
सुदृढ शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या मोहापायी अनेक तरुण आज जिमकडे वळत आहेत. मात्र, फिटनेसच्या नावाखाली वापरण्यात येणाऱ्या काही वजनवाढीच्या पावडर, सप्लिमेंट्स आणि तथाकथित “मास गेनर” उत्पादनांमुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरातील काही जिममध्ये कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा अधिकृत पोषणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय विविध प्रकारच्या पावडर आणि सप्लिमेंट्सची विक्री होत असल्याची चर्चा आहे. अनेक जिम चालकांकडे संबंधित क्षेत्रातील अधिकृत प्रशिक्षण किंवा पात्रता नसतानाही तरुणांना वजन वाढविण्यासाठी विविध उत्पादने घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तज्ज्ञांच्या मते, निकृष्ट दर्जाचे किंवा अनधिकृत सप्लिमेंट्स दीर्घकाळ वापरल्यास यकृत, मूत्रपिंड, हार्मोन्स आणि पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होणे, हार्मोनल असंतुलन आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याचाही धोका असू शकतो. मात्र, हे परिणाम कोणत्या उत्पादनात काय घटक आहेत आणि त्याचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतात.नागरिकांचा सवाल असा आहे की, बारामतीमध्ये विक्री होणाऱ्या या सप्लिमेंट्सची गुणवत्ता, परवाने आणि साठ्याची तपासणी कोण करणार? अन्न व औषध प्रशासन (FDA), आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
फिटनेस हा आरोग्यासाठी आवश्यक असला तरी, केवळ शरीरसौष्ठवाच्या मोहापायी अज्ञात आणि अप्रमाणित पावडरचे सेवन करून तरुणांच्या भवितव्याशी खेळ होऊ नये. संबंधित यंत्रणांनी जिम आणि सप्लिमेंट विक्रेत्यांची व्यापक तपासणी करून नियमबाह्य प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि जागरूक नागरिकांकडून होत आहे.”फिटनेसच्या नावाखाली आरोग्याचा व्यापार थांबला पाहिजे; अन्यथा आजची तरुण पिढी उद्याच्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरी जाऊ शकते.”फिटनेसचा सल्ला कोण देणार? आरोग्याशी खेळ थांबला पाहिजे!”
नागरिकांनीही कोणतेही औषध, सप्लिमेंट किंवा पावडर घेण्यापूर्वी पात्रता असणार्‍या डॉक्टर यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फिटनेस महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचे आहे ते शरिराची सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने आरोग्य जपणे.
– दया दामोदरे
सामाजिक कार्यकर्ते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!