
बारामती / संपादक शशिकांत खरात
अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती वसंतनगर येथे एक अत्यंत देखणे आणि नाविन्यपूर्ण उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे हिरव्यागार जिवंत रोपांच्या माध्यमातून कोरलेले ‘दादा’ हे नाव आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी उभारलेली छायाचित्रे.कल्पकता आणि निसर्गाचा संगम
या उद्यानात निसर्ग आणि कलेचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. उद्यान व्यवस्थापक मिलिंद भिसे साहेब यांच्या संकल्पनेतून, विविध प्रकारची दाट आणि हिरवीगार छोटी झुडपे अशा पद्धतीने लावण्यात आली आहेत की, त्यातून ‘दादा’ हे नाव अत्यंत स्पष्ट आणि आकर्षकरीत्या उमटले आहे. या नावाच्या आजूबाजूला अजितदादांचे विविध प्रसंगांतील फोटो लावण्यात आले असून, यामुळे संपूर्ण परिसराला एक भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले आहे.मार्गदर्शन आणि मेहनत हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान बारामती नगरीचे नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, आणि उद्यान प्रमुख योगिता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. यासाठी नगरपरिषदेचे महेश चांदगुडे, जमालभाई, अक्षय गजरे,आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वृंदाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून ही ‘लिव्हिंग आर्ट’ प्रत्यक्षात उतरवली आहे. नगरपालिकेमधील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग यांचेही यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले
🔅*उद्यानाची ठळक वैशिष्ट्ये:🔅
*हरित अक्षरशिल्प: जिवंत रोपांपासून तयार केलेले ‘दादा’ हे नाव.*
स्मृती दालन: दादांच्या कार्याची साक्ष देणारी सुंदर फोटोंची मांडणी.
सुशोभीकरण: परिसरातील नागरिकांसाठी मन प्रसन्न करणारे वातावरण.
- “अजितदादांचे निसर्गावर असलेले प्रेम आणि त्यांचे कार्य लक्षात घेऊन, केवळ दगड-विटांचे बांधकाम न करता जिवंत रोपांतून त्यांचे नाव साकारण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे उद्यान वसंतनगरची नवी ओळख ठरेल,” असे मत मिलिंद भिसे यांनी व्यक्त केले.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




