Homeताज्या बातम्याबेकायदेशीर अवैध धंद्यांविरोधातील बेमुदत उपोषणाचा १५ वा दिवस; प्रशासनाची भूमिका संशयास्पद, कारवाई...

बेकायदेशीर अवैध धंद्यांविरोधातील बेमुदत उपोषणाचा १५ वा दिवस; प्रशासनाची भूमिका संशयास्पद, कारवाई शून्य

बारामती | प्रतिनिधी —
बारामती शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आज पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र एवढा दीर्घ काळ लोटूनही पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि इच्छाशक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मटका, जुगार अड्डे, ऑनलाइन लॉटरी, गांजा, ताडी, हातभट्टी, गुटखा विक्री यांसारखे अवैध धंदे शहर व तालुक्यात जोरात सुरू असतानाही “धंदे बंद आहेत” अशी कागदी पत्रे देऊन प्रशासनाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र या अवैध धंद्यांचे जाळे अधिकच विस्तारत असल्याचे चित्र आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना देखील प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या आरोग्याशी, तरुणांच्या भवितव्याशी आणि कायदा-सुव्यवस्थेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
“दगडाला पाझर फुटेल पण प्रशासनाला नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अवैध धंद्यांना अभय देणारे कोण आहेत, हफ्ता वसुलीचे सूत्रधार कोण, याची सखोल चौकशी होणार की नाही, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर हे उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
बारामतीतील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कधी जागे होणार, की एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच हालचाल होणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!