बारामती / संपादक शशिकांत खरात
बारामती कसबा येथील साठेनगर परिसरात सार्वजनिक शौचालय टाकीचा भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे या घटनेमध्ये दोन लहान मुले व एक महिला गंभीर जखमी असल्याचे समजले आहे. बारामती नगरपालिका प्रशासन स्थानिक नागरिकांना मूलभूत गरजा देखील व्यवस्थित देत नाही. यामध्ये साठेनगर परिसरातील काही नागरिकांनी बारामती नगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. वारंवार नगरपालिकेला सांगून देखील नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, व स्थानिक नगरसेवक या परिसराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असेही काही नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























