बारामती / संपादक शशिकांत खरात
बारामती नगरपालिका हद्दीत सर्वच स्मशानभूमीत बेकायदेशीर वास्तव्य करून मोठा संसार थाटून राहणारी मंडळी नक्की आहे तरी कोण..? ह्यांना कोणत्याही प्रकारची घरपट्टी नाही पाणीपट्टी नाही तसेच ह्यांना लाईट देखील मोफत आणि विशेष बाब म्हणजे ह्या लोकांना नगरपालिकेने तिथे राहण्याचे आदेश दिले नाहीत ह्यांची तिथे कुठल्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली नाही मग हा सर्व प्रकार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. बारामतीचे सर्व सामान्य नागरिक घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर मयत घेऊन स्मशानभूत गेल्यावर ही तिथली मंडळी त्यांना सांगते की तुम्ही कोणत्याही प्रकारचे मयतीचे समान आणायचे नाही नगरपालिकेने सगळे मयतीचे आमच्याकडेच दिले आहे. असे सांगून प्रत्येक मयतीचे 3 ते 4 हजार एवढी अव्वाची सव्वा रक्कम उकळली जाते. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागात चौकशी केल्यावर हे लोकं कोण आहेत आम्हाला माहितीच नाही असे उत्तर मिळाले मग नगरपालिका एवढ्या दिवस डोळे झाकून बसली होती काय..? असा प्रश्न उपस्थित होतो. मग हा सर्व प्रकार एवढ्या वर्ष झाले संगनमताने सुरू होता का…? ह्यामागे काही नगरसेवकांचा आशीर्वाद असल्याच्या चर्चा देखील बारामती मध्ये रंगल्या आहेत. बारामतीमधील सर्व सामान्य नागरिकांची होणारी लूट कधी थांबणार आणि संबंधितांवर बारामती नगरपालिका कारवाई कधी करणार ह्याकडे सर्व बारामतीकरांचे आता लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























