Homeताज्या बातम्याबारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न*

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न*

*

बारामती, दि.२४:  बारामती आगार, प्रादेशिक परिवहन विभाग बारामती व अखिल भारतीय ग्राहक पंचायत  यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी प्रवासी दिन व चालक दिन बारामती एस.टी. आगार आयोजित करण्यात आला.

यावेळी विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक रविराज घोगरे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, बारामती बस स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विना अपघात सुरक्षित वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांचा प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रवासी दिनानिमित्त चालक, वाहक व प्रवाशांना गुलाबपुष्प व पाणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप सरोदे (सफाईगार) यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया” या संदेशावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

श्री. पाटील यांनी प्रवासादरम्यान वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अतिवेग व बेदरकार वाहनचालना टाळणे याबाबत माहिती दिली. तसेच ‘राहवीर योजना’ याबाबतही मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संजीव बोराटे व महेश पवार यांनी प्रवाशांचे हक्क, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे स्वरूप व ग्राहक संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली.

बारामती विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे व बारामती आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी स्थानकातील सुरक्षा, सुविधा व बस वाहतुकीबाबत सविस्तर माहिती दिली.

संपादक:- शशिकांत खरात (8263056491)

उपसंपादक:- फिरोज (मुन्ना) तांबोळी. 8888551816

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!