Homeबारामतीबारामतीत धक्कादायक प्रकार: स्मशानभूमीत अतिक्रमण करून संसार थाटला , मयत जाळण्यासाठी लूट...

बारामतीत धक्कादायक प्रकार: स्मशानभूमीत अतिक्रमण करून संसार थाटला , मयत जाळण्यासाठी लूट सुरू?

बारामती/ संपादक शशिकांत खरात
बारामती शहरातील नगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत काही लोकांनी बेकायदेशीरपणे संसार थाटून वास्तव्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या लोकांकडे राहण्याबाबत नगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, स्मशानभूमीत राहणाऱ्या व्यक्तींकडून मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. या लोकांकडून ना घरपट्टी भरली जाते, ना पाणीपट्टी भरली जाते, तसेच त्यांना स्मशानभूमीच्या देखरेखीचे कोणतेही अधिकृत आदेश देखील देण्यात आलेले नाहीत, असे सांगितले जात आहे.यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जर नगरपालिकेने स्मशानभूमीचा ठेका दिलेला नाही,कोणतीही निविदा प्रक्रिया राबवलेली नाही,आणि कोणालाही अधिकृत परवानगी दिलेली नाही,तर स्मशानभूमीत हा कारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की काही नगरसेवकांचे या प्रकाराला पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काहींचे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना..? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्मशानभूमी ही सार्वजनिक आणि संवेदनशील जागा असताना तिथे अतिक्रमण करून वास्तव्यास राहणे आणि अंत्यसंस्कारासाठी पैसे उकळणे हा गंभीर प्रकार असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे खालील मागण्या केल्या आहेत :
स्मशानभूमीत राहणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.स्मशानभूमीतील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे.अंत्यसंस्कारासाठी घेतल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीची चौकशी करावी.
जर कोणत्याही नगरसेवक किंवा अधिकाऱ्यांचा संबंध आढळला तर त्यांच्यावरही कारवाई करावी.
दरम्यान, या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.आता या प्रकरणात प्रशासन कठोर कारवाई करते की प्रकरण दडपले जाते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महामध्ये 123 महाविद्यालये अनिवार्य नियमांशिवाय कार्यरत आहेत

0
विभागाच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81 महाविद्यालये आहेत, त्यानंतर अमरावती विभागात 20, नागपूरमध्ये 12, नाशिकमध्ये पाच, पुण्यात तीन आणि कोकण विभागातील दोन...

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

0
केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

30 जून रोजी चालवण्यास प्लांटची संमती संपली, MPCB सह नूतनीकरण प्रशासकीय विलंबामुळे अडकले

0
पुणे : पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा आणि वायु (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायद्यांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मोशीच्या...

error: Content is protected !!