Homeताज्या बातम्याबहुजन समाज पार्टीच्या बारामती शहराध्यक्षपदी भास्कर दामोदरे यांची निवड.

बहुजन समाज पार्टीच्या बारामती शहराध्यक्षपदी भास्कर दामोदरे यांची निवड.

प्रतिनिधी :-
बहुजन समाज पार्टीच्या बारामती शहराध्यक्षपदी उच्चशिक्षित व सामाजिक जाण असलेले भास्कर दामोदरे यांची निवड करण्यात आली आहे. बारामती शहराला पहिल्यांदाच उच्च शिक्षण घेतलेले शहराध्यक्ष लाभल्याने पक्षासह सामाजिक क्षेत्रातही या निवडीचे स्वागत होत आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बहुजन समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळुरामजी चौधरी यांनी दिली.
या निवडीमुळे बारामती शहरातील बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारावर संघटन वाढविण्याचा निर्धार नवनियुक्त शहराध्यक्ष भास्कर दामोदरे यांनी व्यक्त केला आहे.
दुर्लक्षित व दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच समाजातील मूलभूत प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणे, या मुद्द्यांवर आपले विशेष लक्ष राहील, असे दामोदरे यांनी सांगितले. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीही त्यांनी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समस्यांवर सक्रियपणे काम केले असून, पुढील काळात हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भास्कर दामोदरे यांचे अभिनंदन केले. शहर पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, जनसंपर्क वाढविणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बहुजन समाज पार्टी अधिक सक्रिय राहील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!