

बारामती / संपादक: शशिकांत खरात
बारामती कसबा परिसरात प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडणुकीच्या काळात नागरिकांना भली मोठी आश्वासने देण्यात आली होती मात्र आता त्याचा विसर पडला की काय ?हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. साठेनगर परिसराकडे प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? इथे रस्ते, लाईट, ड्रेनेज, सर्व मूलभूत सुविधांची दुर्दशा झाली आहे. नक्की साठेनगर परिसरात विकास करण्यास अडचण तरी काय आहे ? यावरती प्रशासनाने व नगराध्यक्ष तसेच लोकप्रतिनिधींनी आता खुलासा करणे गरजेचे आहे. लवकरच विकास कामे सुरू झाली नाहीत तर साठेनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




