संपादक / शशिकांत खरात
पणदरे तालुका बारामती येथील गावठाण जागेत ग्रामपंचायत मिळकत नंबर 192/3 ही जागा अंगणवाडीसाठी नियोजित असताना या जागेत अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई का होत नाही असा थेट सवाल विक्रम भगत कोकरे पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निकसित करणे फिर्याद दाखल करणे शासन परिपत्रक क्रमांक व सुधारित शासन निर्णय प्रमाणे व जमीन 03/2009/ प्र. क्र. 13 ड ज/ 1 दिनांक 10 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे गायरान व सार्वजनिक जमिनी व गावठाण इतर शासकीय जमिनीतील अतिक्रमणांवर फौजदारी कारवाई केली नाही असा आरोप विक्रम भगत कोकरे यांनी केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा ठळक इशारा विक्रम भगत कोकरे पाटील यांनी दिला पणदरे खडकआळी अंगणवाडी जागेतील अतिक्रमणवांवर कारवाई होईपर्यंत व पणदरे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अतिक्रमण निदर्शनास आल्यावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे .

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




