
संपादक/ शशिकांत खरात
बारामती: शहरातील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसावा यासाठी तीन हत्ती चौक येथे सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक माने साहेब यांच्या आदेशानुसार पार पडली.
या नाकाबंदी मोहिमेत ग्रेड पोलीस अधिकारी काळे सर, हेड कॉन्स्टेबल काळे (ब.क्र. २३३), महिला हेड कॉन्स्टेबल जमदाडे मॅडम तसेच पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला.या वेळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. तसेच काळी काच असलेली वाहने व नंबर प्लेट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलन मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात शिस्तबद्ध वाहतूक आणि कायद्याबद्दल जनजागृती निर्माण झाली आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























