Homeक्राईमजबरी चोरी प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ घाडगे जेरबंद येरवडा कारागृहात रवानगी

जबरी चोरी प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ घाडगे जेरबंद येरवडा कारागृहात रवानगी

संपादक/ शशिकांत खरात
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा वेगवान, शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक तपास करून बारामती शहर पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक करत कायद्याचा ठोस धाक निर्माण केला आहे.
दि. 08/02/2026 रोजी बारामती येथील शिवाजी चौक परिसरात फिर्यादीकडून मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 63/2026, भा.न्या.सं. कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि सखोल चौकशीच्या आधारे आरोपी नामे सिद्धार्थ संतोष घाडगे (वय 31 वर्षे, रा. सटवाजी नगर, इंदापूर चौक, ता. बारामती, जि. पुणे) याचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग निष्पन्न झाला. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अंगझडती दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली.
आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास प्रथम पोलीस कोठडी मंजूर झाली. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृह येथे करण्यात आली आहे.
या प्रभावी कारवाईमुळे परिसरात कायद्याची जरब बसली असून गुन्हेगारी प्रवृत्तीला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, कोणताही गुन्हेगार कायद्याच्या चौकटीबाहेर राहू शकत नाही. बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असून गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरूच राहील.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वात पार पडली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे तसेच स्टाफ पोलीस हवालदार सुलतान डांगे, पोलीस शिपाई विशाल चौधर, पोलीस शिपाई सागर जामदार, पोलीस शिपाई विशाल शिंदे, पुरुष शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार अमोल शिंदे व पोलीस शिपाई नेवसे यांनी समन्वयाने आणि तत्परतेने ही कारवाई यशस्वी केली.
बारामती शहर पोलिसांच्या या कार्यक्षम कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!