Homeताज्या बातम्याकविवर्य मोरोपंत वाचनालयाकडे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांची वाचनालय दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी..!

कविवर्य मोरोपंत वाचनालयाकडे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांची वाचनालय दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी..!

संपादक / शशिकांत खरात
बारामती : बारामती नगर परिषदेच्या अखत्यारीतील भिगवण चौक परिसरातील कविवर्य मोरोपंत वाचनालय हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अभ्यासकेंद्र मानले जाते. मात्र सध्या या वाचनालयाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार विद्यार्थी व वाचकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वाचनालय सकाळी आणि संध्याकाळी काही तासच सुरू ठेवले जाते. दिवसभर वाचनालय बंद असल्याने स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास तसेच इतर वाचनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हे वाचनालय दिवसभर सुरू ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याशिवाय वाचनालयातील शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या महिनाभरापासून स्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्याने वाचनालयात येणाऱ्या वाचकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छता व देखभाल याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.वाचनालयात येणाऱ्या वाचकांची नोंद ठेवण्यासाठी असलेले रजिस्टरही नियमितपणे भरले जात नसल्याची तक्रार समोर आली आहे. किती वाचक येतात, किती वेळ अभ्यास करतात याची अचूक नोंद न ठेवल्यामुळे व्यवस्थापनातील त्रुटी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विद्यार्थी व नागरिकांनी बारामती नगर परिषद प्रशासनाला आवाहन केले आहे की, वाचनालयातील स्वच्छता, शौचालय दुरुस्ती, नियमित देखभाल आणि नोंदवहीचे व्यवस्थापन याकडे तातडीने लक्ष द्यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कविवर्य मोरोपंत वाचनालय दिवसभर खुले ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी :
1)वाचनालय सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर सुरू ठेवावे.
2)शौचालयांची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करावी.
3)वाचनालय परिसराची नियमित साफसफाई करावी.
4)वाचक नोंदणी रजिस्टर नियमितपणे भरले जावे.
5)विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे बारामती नगर परिषद प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!