
संपादक / शशिकांत खरात
बारामती : बारामती नगर परिषद मध्ये कंत्राटी कामगार काम करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात असतात.मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही. तरीदेखील कंत्राटी कामगार या अडचणींना सामोरे जाऊन दिलेले काम करत असतात.या कामगारांचे आरोग्य चांगले राहून काम करतील यासाठी कधी उपाययोजना नाही.काम जास्त आणि पगार कमी त्याचबरोबर कामगारांवर वेगवेगळे नियम लादणे सुरुच असते.कंत्राटी कामगार सुधा बारामतीकर आहे. हे विसरून चालणार नाही. कंत्राटी कामगार बारामतीचे मतदार आहेत. पण या मतदारांच्या हिताचे निर्णय सत्ताधारी कधीच घेताना दिसत नाहीत. कामगारांना त्याच्या कामाचा मोबदला न मिळता ठेकेदाराला फायदा होत असेल तर ही पध्दत चुकीची आहे. या पद्धतीमध्ये बदल करण्याचा सत्ताधाऱ्यांनी विचार केला पाहिजे.
जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने कंत्राटी कामगारांची बैठक संपन्न झाली.बारामती येथे कंत्राटी कामगारांवर सुरू असलेल्या अन्याया बाबत यावेळी चर्चा झाली.कामगारांना किमान वेतन,महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार,पी.एफ.,ई.एस.आय.एस. दिला पाहिजे.काही तांत्रिक ,आणि प्रशासकीय बाबी वर यावेळी चर्चा झाली.बारामती नगर परिषद कंत्राटी कामगार यांचा बारामती स्वच्छ करण्यामध्ये मोठा वाटा आहे. त्याबाबत त्यांना कधीही सन्मान मिळत नाही. त्यांची कायम पिळवणूक होत आहे.ही पिळवणूक थांबलीच पाहिजे. यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढा देणार आहे.असे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात
























