Home#महावितरणवीज चोरीच्या तक्रारीकडे पाठ फिरवली मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचा वीज चोरांशी...

वीज चोरीच्या तक्रारीकडे पाठ फिरवली मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचा वीज चोरांशी ‘अदृश्य हितसंबंध’ आहे का?

बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वीज चोरीबाबत तक्रार करण्यासाठी स्वतः नागरिक महावितरण कार्यालयात गेले असता, महावितरणाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी थेट भेट देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर नागरिक हे कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नव्हे, तर तालुक्यात सुरू असलेल्या वीज चोरीवर तातडीने कारवाई व्हावी या उद्देशाने मुख्य अभियंत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, वीज चोरीसारख्या गंभीर व सार्वजनिक हिताच्या विषयावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देण्यास स्पष्ट नकार दिला, हे विशेष.
महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी वेळोवेळी मोहिमा, जाहिराती आणि कारवाईचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात वीज चोरीची माहिती देण्यासाठी आलेल्या तक्रारदारालाच जर भेट नाकारली जात असेल, तर या मोहिमा केवळ कागदावरच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
“बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी उघडपणे वीज चोरी सुरू आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी मी स्वतः मुख्य अभियंत्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यांनी मला भेटण्यास नकार दिला,” असे संबंधित नागरिकाने सांगितले.
या घटनेमुळे महावितरण प्रशासनाची जबाबदारी, कार्यपद्धती आणि वीज चोरीबाबतची गंभीरता यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वीज चोरीवर कारवाई होणार की तक्रारदारांनाच दुर्लक्षित केले जाणार? असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाबाबत महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!