Homeताज्या बातम्याबारामतीत ‘अजितदादा पवार स्मृती भवन’ची मागणी; नटराज वास्तूत संग्रहालय उभारण्याचे निवेदन प्रस्ताव...

बारामतीत ‘अजितदादा पवार स्मृती भवन’ची मागणी; नटराज वास्तूत संग्रहालय उभारण्याचे निवेदन प्रस्ताव – दया दामोदरे

संपादक : शशिकांत खरात
बारामती, प्रतिनिधी : बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातील तिरंगा चौक येथील ऐतिहासिक नटराज वास्तूस ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या मा. अजितदादा पवार यांचे नाव देऊन तेथे भव्य स्मृती संग्रहालय (Museum) उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दयावान विजय दामोदरे यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, बारामतीच्या सर्वांगीण विकासात अजितदादा पवार यांचे योगदान मोठे असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि नागरी विकासाची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे तिरंगा चौक येथील नटराज वास्तूचे नामकरण “मा. अजितदादा पवार स्मृती भवन” असे करण्यात यावे. विशेष म्हणजे दादांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असल्याने त्याच दिवशी नामकरण सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.याचबरोबर सदर वास्तूमध्ये अत्याधुनिक स्मृती संग्रहालय उभारून अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिहास जतन करण्यात यावा. संग्रहालयात त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार, सन्मानचिन्हे, महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे, बारामतीच्या विकासाशी संबंधित दस्तऐवज, डिजिटल माहिती दालन तसेच त्यांच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्याची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच नटराज वास्तू सार्वजनिक हितासाठी बारामती नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. वास्तूसंदर्भात कोणतेही करार, भाडेकरार अथवा इतर कायदेशीर बाबी अस्तित्वात असल्यास त्यांची तपासणी करून जनहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या मागणीबाबत नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास व निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दयावान दामोदरे यांनी दिला आहे. त्यामुळे या मागणीकडे बारामतीकरांचे लक्ष लागले असून नगरपरिषद प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!