Homeताज्या बातम्याबारामती तहसील आणि  प्रांत कार्यालय मध्ये रेकॉर्ड रूममधील गंभीर प्रकार!

बारामती तहसील आणि  प्रांत कार्यालय मध्ये रेकॉर्ड रूममधील गंभीर प्रकार!

बारामती | संपादक:- शशिकांत खरात
बारामती तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालयातील नागरिक अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) संदर्भात अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिकांना थेट रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश देऊन ते स्वतः हाताने जुनी कागदपत्रे, फेरफार नोंदी, ७/१२ उतारे आणि इतर महत्त्वाचे अभिलेख पडताळत असल्याचे दिसून आले आहे.
शासनाच्या नियमानुसार रेकॉर्ड रूम ही संरक्षित जागा मानली जाते. अभिलेखांचे जतन, सुरक्षितता व नोंदींची शुद्धता राखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांवर असते. मात्र नागरिकांना थेट प्रवेश दिल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे हरवण्याचा, बदलण्याचा किंवा छेडछाड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काही नागरिकांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीशिवायच फाईल्स बाहेर काढून तपासण्याची मुभा दिली जाते. हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कायद्याच्या दृष्टीने पाहता, शासकीय अभिलेखांमध्ये अनधिकृत प्रवेश हा गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचा प्रश्न असा आहे की —
जर अभिलेख रूममध्येच नागरिकांना मुक्त प्रवेश असेल, तर दस्तऐवजांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी स्तरावर तक्रार दाखल करण्याची तयारी काही नागरिकांनी दर्शवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम..!

0
संपादक /शशिकांत खरातबारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपुलकीच्या भावनेतून विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी...

बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन देऊ नका; अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कडक अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते...

0
बारामती / संपादक शशिकांत खरात पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांचा समावेशअहिल्यानगर, दि. २१ ऑगस्ट २०२६ :अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती,जिल्हा...

चायनीज मांजाचा धोकादायक विळखा; जुना मोरगाव रोड येथे तरुणाला मांजा कापल्यामुळे गंभीर दुखापत..!

0
बारामती : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. जुना मोरगाव रोड येथे एका मुलाच्या चेहऱ्याला चायनीज मांजामुळे...

कासम चाचा कुरेशी यांच्या नव्या व्यवसायाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0
बारामती: आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून देशप्रेमी कासम चाचा कुरेशी यांच्या के के ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचे दिमाखात उद्घाटन झाले. आज...

कासम चाचा कुरेशी यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओकडून अवैध वाहनांवर कारवाईचे आश्वासन

0
बारामती : जनावरांच्या वाहतुकीसाठी आरटीओ परवाना असलेल्या वाहनांना नियमितपणे जनावरांच्या बाजारात वाहतूक करण्याची परवानगी मिळावी, विनापरवाना वाहनांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांना...

error: Content is protected !!