Homeक्राईमइंदापूर तालुक्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असणारा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व...

इंदापूर तालुक्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असणारा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक गुन्हेगार अंबादास तायप्पा पवार एम. पी.डी.ए कायद्याअंतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध

संपादक / शशिकांत खरात

मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षांचे कालावधी मधील दाखल गुन्ह्यामधील जामीनावर मुक्त झालेले आरोपी, तसेच त्यांचे विरुद्ध पुन्हा दाखल झालेले गंभीर गुन्हे यांचे रेकॉर्ड अद्ययावत करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले होते. तसेच सदर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दरोडा, खून , खुनाचा प्रयत्न , जबरी चोरी , हायवे रोडवरील लुटमारी करणारे, अवैधपणे अग्निशस्त्रे बाळगणारे, सराईत व धोकादायक व्यक्ती यांचे विरुद्ध कारवाईचा बडगा उगारून एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्ह्यामधील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम नामे अंबादास तायप्पा पवार वय वर्ष 38 राहणार चिखली तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे विरुद्ध यापूर्वी सन 2011, सन 2014, सन 2016, सन 2024, सन 2026 मध्ये बेकायदेशीर गर्दी जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करणे, दरोडा घालण्याची पूर्वतयारी करून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, अवैधपणे बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे, संगणमत करून जबरी चोरी करणे, संगणमत करून मृत्यू किंवा जबर दुखापत याची भीती घालून खंडणी मागणे, दरोडा घालने, जमावबंदीचा आदेश असताना अवैधपणे बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे संघटित गुन्हेगारी करून कट रचून दरोडा घालने संगणमत करून घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत करून खुनाचा प्रयत्न करणे. बेकायदेशीर गर्दी जमाव जमवून लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी बल प्रयोग करून इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे व वीस हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल याची हानी अथवा नुकसान करणे असे भारतीय दंड विधान 1860 चे प्रकरण 16 व 17 नवीन भारतीय न्याय संहिता 2023 चे प्रकरण 06 व 17 तसेच भारतीय हत्यार कायदा प्रकरण पाच मधील 10 गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कार्यवाही होणे कामी प्रभारी अधिकारी श्री गोपाळ पवार पोलीस निरीक्षक, वालचंद नगर पोलीस स्टेशन यांनी मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी करून तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करिता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्याकडे पाठविला होता. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी सो, यांनी इसमनामे अंबादास तायप्पा पवार वय वर्ष 38 राहणार चिखली तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासून प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती ( व्हिडिओ पायरेटस ) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या आणि मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम 1981 चा ( सुधारणा अधिनियम सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29) अन्वये आदेश पगम / एम पी डी ए / एस आर / 19/01/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी सो यांचे स्थानबद्धतेचे आदेशान्वये यास वालचंद नगर पोलीस स्टेशन कडे पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार यांनी वालचंद नगर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांचे मदतीने शोध घेऊन त्यास दिनांक 15/10/2026 रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद  क्षीरसागर , स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार डुणगे तत्कालीन प्रभारी अधिकारी, वालचंद नगर पोलीस स्टेशन, श्री. अविनाश घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक, वालचंद नगर पोलीस स्टेशन, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, रामदास बाबर, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड, गणेश झरेकर, गणेश काटकर, विकास निर्मळ, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अजित राऊत, राहुल माने वालचंद नगर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केलेली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!