Homeताज्या बातम्याबोगस मोजणी नकाशावर हॉस्पिटलला मंजुरी दिल्याचे उघड; बारामती नगर परिषद संशयाच्या भोवऱ्यात...

बोगस मोजणी नकाशावर हॉस्पिटलला मंजुरी दिल्याचे उघड; बारामती नगर परिषद संशयाच्या भोवऱ्यात नक्की कारवाई होईल का…?

बारामती :
बारामती येथील सुप्रसिद्ध डॉक्टर दिलीप लोंढे यांचे चिरंजीव डॉ. निखिल दिलीप लोंढे यांचे बारामती स.नं. २६६ येथे सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या नवीन बांधकामाला बोगस व अवैध मोजणी नकाशाच्या आधारे मंजुरी देण्यात आल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख यांनी दिनांक १४ मे २०२५ रोजी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद तसेच सहाय्यक नगर रचनाकार श्री. गीते यांच्या मार्फत चौकशी व सुनावणी करण्यात आली.
चौकशीदरम्यान उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या खुलासा पत्रात गंभीर बाब समोर आली. डॉ. निखिल लोंढे यांनी हॉस्पिटल बांधकाम परवानगीसाठी सादर केलेला मोजणी नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकृत नोंदीत अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या क्रमांकाने कोणत्याही प्रकारची मोजणी झालेली नसल्याचेही उघड झाले.
यामुळे बोगस शिक्के वापरून बनावट मोजणी नकाशा तयार करून बांधकाम परवानगी घेण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख यांची तक्रार खरी ठरली असून, या प्रकरणात डॉ. निखिल लोंढे यांनी बोगस मोजणी नकाशाच्या आधारे बांधकाम परवानगी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात नगर परिषदेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोहेल शेख यांनी आक्षेप नोंदवत विचारणा केली आहे की,
“जेव्हा मूळ बांधकाम परवानगीच बोगस मोजणी नकाशावर दिली गेली असल्याचे सिद्ध झाले आहे, तर अशा प्रकरणात सुधारित बांधकाम परवानगी कशी देता येऊ शकते? नगरपालिकेने डॉक्टरांना पळवाट का दिली?”
असे असतानाही एमआरटीपी कायद्यानुसार सदर बांधकाम परवानगी रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहीत, यामुळे नगरपालिकेची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांच्या आदेशाविरोधात मा. उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख यांनी सुरू केल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीच्या शासकीय धान्य गोदामात रात्रीच्या हालचालींची चर्चा! नेमका धान्याचा खेळ काय? ‘अ’ आणि ‘म’...

0
बारामती | विशेष वृत्तबारामती तालुक्यातील स्वस्त धान्याच्या शासकीय गोदामातून रात्री-अपरात्री धान्याने भरलेल्या गाड्या बाहेर पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. दिवसा शांत...

बारामतीत चारा बियाण्यांचे मोफत वाटप; शेतकऱ्यांच्या पशुधनाला मिळणार आधार

0
बारामती, दि.९: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना...

ऐन दिवाळीत बारामती पोलिसांचा नशेच्या इंजेक्शनच्या कथित अवैध विक्रीवर जबरदस्त घणाघात! ११० इंजेक्शनचा दुसरा...

0
बारामती | दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ मे महिन्यात १०० इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला गौरव जाधव पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात! यावेळी तीन साथीदारांसह ११० इंजेक्शनचा...

खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी असलेला, शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्याचीही नोंद असलेला जयेश माने पुन्हा खुनाच्या...

0
बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! धारदार कोयत्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून अटक! पोलीस शिपाई...

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना...

0
संपादक / शशिकांत खरातदिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती; चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या...

error: Content is protected !!