Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरीचे जिल्ह्याचे प्रमाणपत्र घेतात संदीप साहेब गिल्ल मग बारामती तालुका...

महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरीचे जिल्ह्याचे प्रमाणपत्र घेतात संदीप साहेब गिल्ल मग बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय वाल्यांसोबत कोण करतंय डील..?

बारामती / संपादक शशिकांत खरात

बारामती (संपादकीय) – महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र समोर येत आहे. जुगार अड्डे, मुंबई–कल्याण–पुणे मटका, गांजा विक्री, गावठी दारू निर्मिती, ऑनलाईन चक्री जुगार तसेच शासनाने बंदी घातलेला गुटखा हे सर्व प्रकार उघडपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, काही पोलिस घटकांकडून “हाफ्ता वसुली”च्या माध्यमातून या अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात आहे. LCB व DB पथकांमार्फत विशेष व्यक्तींमार्फत वसुली केली जात असल्याचे आरोपही जोर धरत आहेत.याच पार्श्वभूमीवर, नुकतेच मुख्यमंत्री  यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक  यांचा गुन्हेगारी कमी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बारामती तालुक्यात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे हा सन्मान प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे.गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली असतानाही बारामतीत तालुका हद्दीत जवळपास प्रत्येक टपरीवर गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. यामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी ,बारामतीतील सर्व अवैध धंद्यांची उच्चस्तरीय चौकशी हाफ्ता वसुली प्रकरणाची स्वतंत्र तपासणी,दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी राज्यस्तरीय विशेष मोहीम राबविणे नागरिकांचा इशारा आहे की, तात्काळ कारवाई न झाल्यास बारामतीत कायद्याचा धाक पूर्णपणे संपुष्टात येईल. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महामध्ये 123 महाविद्यालये अनिवार्य नियमांशिवाय कार्यरत आहेत

0
विभागाच्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81 महाविद्यालये आहेत, त्यानंतर अमरावती विभागात 20, नागपूरमध्ये 12, नाशिकमध्ये पाच, पुण्यात तीन आणि कोकण विभागातील दोन...

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

0
केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

30 जून रोजी चालवण्यास प्लांटची संमती संपली, MPCB सह नूतनीकरण प्रशासकीय विलंबामुळे अडकले

0
पुणे : पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा आणि वायु (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायद्यांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या मोशीच्या...

error: Content is protected !!