
फलटण रोडवरील मुल्ला वस्ती परिसरातील प्रकार; खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह!
बारामती : अरे बाबा, भंगार दुकानात भंगार ठेवायचं की खाण्याचे पदार्थ बनवायचे? बारामतीच्या फलटण रोडवरील मुल्ला वस्ती परिसरात खाद्यपदार्थ तयार करणारी बेकरी चक्क भंगार दुकानात चालवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या ठिकाणी खाण्याचे पदार्थ तयार होतात, तिथं स्वच्छता असायला नको का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.भंगाराच्या दुकानात बेकरी, स्वच्छतेचं काय?
खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळले जातात का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. परिसरातील स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित बेकरीची अन्न व औषध प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी होऊ शकते.अधिकारी आता तरी जागे होणार का? सामान्य माणसाच्या पोटात जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत हलगर्जीपणा चालणार नाही. त्यामुळे संबंधित बेकरीकडे आवश्यक परवाने आहेत का, स्वच्छतेचे नियम पाळले जातात का आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जागा योग्य आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
आता प्रश्न एकच — भंगार दुकानात बेकरी चालत असेल, तर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




