संपादक | शशिकांत खरात
बारामती तिरंगा चौक ( तीन हत्ती चौक) येथील कॅनॉल परिसरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्त्यावर दगडफेक व मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी एकमेकांवर दगडफेक व काठ्या फेकून मारताना, तसेच रस्त्यावर पळापळ आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. या प्रकारामुळे सार्वजनिक रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.रस्त्यावरच मारामारी, काठ्यांचा वापर!शालेय विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे रस्त्यावर गोंधळ घातला जात असल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यावर अचानक पळापळ किंवा काठ्या फेकण्याच्या प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा प्रशासन आणि पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांचे भविष्य लक्षात घेता, अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि सार्वजनिक ठिकाणी योग्य वर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी पालक आणि शाळा प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.या घटनेची संबंधित यंत्रणांनी दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




