
बारामती/ संपादक शशिकांत खरात
बारामती (प्रतिनिधी):
साठेनगर (कसबा) परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभारलेले प्रवेशद्वार सध्या तुटलेल्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते केदार पाटोळे यांनी बारामती नगर परिषदेकडे पुन्हा एकदा लेखी निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.पाटोळे यांनी सांगितले की, यापूर्वी 17 जानेवारी 2026 रोजी नगर परिषदेला तक्रार देण्यात आली होती. मात्र तब्बल नऊ महिने उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे 23 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात तुटलेल्या अक्षरांची तातडीने दुरुस्ती करावी, महापुरुषांच्या नावाची अक्षरे स्पष्ट आणि ठळक दिसतील अशी व्यवस्था करावी तसेच संपूर्ण कमानीचे नूतनीकरण करून योग्य देखभाल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.“महापुरुषांच्या नावाचा अवमान सहन केला जाणार नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केदार पाटोळे यांनी दिला आहे.या प्रकरणात नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे साठेनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – शशिकांत खरात




